May 15, 2010

आज महाराजांबद्दल लिहण्यास कारण म्हणजे नुकताच महाराष्ट्र दिन साजरा झाला ज्या महाराष्ट्राला घडवण्यात मोठा वाटा असणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले.पण आज त्याची आठवण किती जणांना आहे याचीच शंका येते प्रत्येक जण नुसते त्यांचे नाव स्वतच्या स्वार्थासाठी  वापरतो आहे .मग कोणी राजकारणासाठी तर कोणी स्वताला प्रसिद्धी मिळवण्यासाठी .आज प्रत्येक जण उठतो आहे आणि आपल्या सवडी प्रमाणे त्यांची जयंतीसाजरी करतो आहे आणि मग त्यातून आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या मोठ्या मिरवणुका, अनेक कार्यक्रम, अनेक शिबीरे आणि मग त्याच्यातून स्वतःची पोळी भाजून घेण्यावर सगळ्यांचा भर.पण महाराजांबद्दल आस्था असणारे फार थोडे लोक आढळतात कि ज्यांना काहीना काही करण्याची उर्मी असते पण त्यांचे ऐकणारे कोणी नसते . मला तर एक काळात नाही हे अश्या प्रकारे सिनेमाची गाणी लावून दारू पिवून नाचले म्हणजे अभिमान दाखावाल्यासारखे होते का ? आज किती जण असे आहेत कि जे खरेच या विचारांनी प्रेरित आहेत. स्त्रीबदल आदर , मातृभूमीबदल प्रेम, प्रत्येक धर्माबद्दल आदर याची तर कोणाला काडी मात्र जाणीव नाही. धर्मवीर संभाजी महाराजांची  जयंती देखील नुकतीच साजरी झाली त्या वेळेस एक मिरवणूक पहिली तर त्या मिरवणुकीत "सात समुंदर पार मे तेरे पिचे पिचे" हे गाणे ऐकले आणि अंगावर काटाच उभा राहिला नेमकी मिरवणूक कशाची हा प्रश्न उभा राहिला ?
जयंती असते कशासाठी हेच ९०% लोकांना माहित नाही. होऊन गेलेल्या थोर लोकांचे स्मरण राहण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत या गोष्ट पोहोचण्यासाठी, त्या लोकांचे विचारांचे स्मरण आणि आचरण करण्यासाठी जयंती साजरी करावी पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढून आदर्श समाज घडवावा हि एक साधी अपेक्षा 


May 6, 2010

"लाईटचा आहेर"

सुट्टी साठी सहजच गावकडे जाणे झाले. एके दिवशी काही काम नाही म्हणून मामाच्या दुकानातील माल पोचवण्यासाठी त्याच्या बरोबर निघालो.
आभाळ भरून आले होते ,विजा चमकत होत्या थोडे पुढे गेलो आणि पावसाचा मारा सुरु झाला. माल टाकण्यासाठी गेलेले गाव अत्यंत आडरानी होते.
कधीतरी एखादी गाडी रस्त्यावरून जाताना येताना दिसत होती.त्या अवेळी आलेल्या पावसात हि आम्ही दोघे माल टाकून परत निघालो.
परतीचा मार्ग चालू झाला तरी पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता , गाडीचा वेग हि आता बऱ्यापेकी मंदावला होता. अंधाराचे साम्राज्य पसरत चालले
होते चमकणाऱ्या विजा त्या अंधारला दूर करण्याचा जणू प्रयतनच करत होत्या. आम्ही मात्र त्यांचा चाललेला खेळ पाहत गाडीच्या दिव्यात कसाबसा रस्ता
काटत होतो. त्याचवेळेस अचानक एका झाडाखाली कोणीतरी गाडीला हात दाखवत आहे असे दिसले गाडीचे ब्रेक लावले गाडी थांबली त्या झाडाखाली एक माणूस
चिंब भिजलेल्या अवस्थेत उभा होता. मी त्याला विचारले काय काम आहे ? तर गावकडे यायचे आहे म्हणाला आम्ही त्याला होकारार्थी मान हलवली त्यावेळेस
त्याच्या तोंडावर उठलेले हास्य काळीज चीर करून गेले आणि आज महाराष्ट्रच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सरकार किती खेड्यापर्यंत पोहचले आहे याचे एक उदाहरणच
देवून गेले
तो काही एक विचार न करता पटकन गाडीत चढला आणि पाठीमागे समान ठेवायच्या जागी जावून बसला . गाडी पुन्हा चालू झाली थोड्या वेळाने मागे असलेल्या
खिडकीतून तोंड घालून त्याने सांगीतले "नाक्यावर सोडा " मी त्याला हो म्हणालो. मग माझ्या आपल्या त्याच्याशी गप्पा चालू झाल्या मी त्याला विचारले इतक्या पावसात
कुठे निघाला मामा ? त्यावर त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे शहरात राहणाऱ्या माणसाला मारलेली सणसणीत चपराक होती ते म्हणाला " मालक पेरणी केली होती आताच , सार
घरबार राबल शेतात ........., खूप अपेक्षा होती येणाऱ्या पिकावर. यंदाच्या पिकावर या दिवाळीत मोठया मुलीचे लगीन करयचं होतं बघा पण हि लाईट म्हणजे जणू यमकाळ ठरली
आहे आमच्यासाठी १५-१६ तास नसते आणि ज्यावेळेस येते त्यावेळेस पाक कमी पावर ने येते त्याच्यावर घरातला बल्ब भी नीट चालत नाही तर विहिरीवरची मोटार काय खाक चालयची.
पाणी नाही मिळाल पिकला त्यामुळे नवीन रोप जळून गेलं बघा आता परत बी आण्याच हाय आणि नवीन पेरणी करयाची हाय निदान हा पाऊस तरी काय तरी करल इतकीच अपेक्षा .
तुमच बर हाय नाय का २४ घंटे लाईट असती नव्ह का ? कारखान असतात तुमच्याकड म्हणून २४ घंटे लाईट आणि आमच्याकड काहीच नाही व्हये ? पण मालक तुमच्या कारखान्यातली
माणसं काय हवेवर जगतात काय पोट भरायाला तर आम्हीच पुरवतो की धान्य मगच ताकदीनं काम करतात ती मग लाईट ची गरज कोणाला हाय ? लई नको पण पाहिजे तितकी तरी द्या की
तुम्हाला टी.वी,टेप, थंड हवेच मशीन लावयला लाईट हाय आणि आम्हाला पाण्यापुर्ती सुद्धा नाही असं का ?"
त्यांचे बोलणे चालू होते तितक्यात नाका आला गाडी थांबली मामा उतरले आणि सदऱ्याच्या खिशात हात घालत पैसे पुढे करू लागले मी नकारअर्थी मान हलवली तरी ते आग्रह करत होते
"कोणाचे फुकट उपकार घेत नाही आम्ही" म्हणत हात तसाच पुढे करून उभा होते तितक्यात गाडी हलली आणि आम्ही पुढे आमच्या वाटेकडे निघालो मामा नजरे आड होई पर्यंत मी त्यांच्याकडे
पाहत होतो परीस्थीने ग्रासलेल्या त्या माणसाच्या मनाच्या मोठेपणाने माझ्या डोळ्यात मात्र पाणी उभे केले होत त्यावेळेस मी ठरवले की जितकी शक्य आहे तितकी मदत या सर्वाना करयाची
कशी तर अनाआवश्यक लाईट वापर टाळून आवश्यक तितकी लाईट वापरून म्हणजे अश्या किती तरी शेतकरी बांधवांच्या मुलींच्या लग्नात दिलेला तो एक मोठा "आहेर" असेल नाही का ............

April 27, 2010

तिची मैत्रीण




आमच्या कॉलेज मध्ये
पहिल्यांदाच कोणीतरी आवडली
रोज कटयावर बसयाची
मी येताच मैत्रिणीनकडे
पाहून गालात हास्याची

खूप बरे वाट्याचे मग
माझ्यासाठीच सारे काही
आहे असे समजून मग
मी पण आपलं lecture बुडवून
कटयावरच बसयाच

मैत्रिणीन च्या मागून माझ्याकडे
पाहयची, या पाहण्या पाहण्यात
सकाळची दुपार व्हायची आणि
वेळ झाली म्हणून मग घरी निघून जायची

असे करत करत महिने उलटून गेले
आणि काय कुणास ठावूक
एकदा तिच्या मैत्रिणीनेच उठून
मला propose केले मग मला काय

नाही झाली तू माझी म्हणून
नाही मला फिकर
नाही होणार तुझ्या माझ्या जीवनात जीकर
शेवटी तू नही तो और सही
आणि तुझ्यापेक्षा तुझी मैत्रीण भारी
.......................अविरत
०६/०३/२०१०
१२:५५

April 26, 2010

"आठवण"

किती वेळा पहिले तरी
मन काही भरत नाही
नाही म्हटले तरी तुझा
स्पर्श आठवल्या शिवाय
राहत नाही

उगाच का तुझ्या आठवणीत
झुरतो आहे मी
तू तिकडे सुखात असताना
इकडे उगाच का रडतो आहे मी

तुझ्या एका मिठीची आठवण
आज हि आहे मला
कधी तरी येशील आणि पुन्हा
मिठीत घेशील इतकीच आस आहे मला

तुझ्या ओठाचा स्पर्श आज हि
उमगत नाही आहे मला
तो विषाचा पेला होता कि
अमृताचा हेच अजून
समजत नाही आहे मला

येणा प्रिये तुझ्या वाचून जीव
माझा अधुरा आहे
त्याच्या प्रेम पेक्षा पण
माझ्या प्रेमात तुझा
सुखाचा संसार आहे

..............................
.....अविरत
१९/०१/२०१०
११:३४ pm

April 24, 2010

हवी होती फक्त दोन अक्षरं


हवी होती फक्त दोन अक्षरं
पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म'

'म' म्हणजे मन माझं
'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी

धुंद अश्या मना माझ्या
लागली आस प्रेरणेची तुझ्या

वाटलं होतं एकदातरी जुळतील, हि अक्षरं
जुळनं राहिलं लांबच,बहुतेक होतील नश्वर

गेली वेळ निघुन आता, झाले अक्षरांचे शब्दांतर
दुसऱ्या अक्षराच्या माझ्या, झाले आज 'त' त रुपांतर
हवी होती फक्त दोन अक्षरं

तुझी आठवण

तू नसताना

तुझ्या आठवणी इतक्या कि आठवताना
त्यासाठी आभाळाची उपमा कमी पडेल
लिखाणासाठी सागराच्या पाण्याची
शाई सुद्धा कमी पडेल

आज पाठीमागून येवून हळूच
गळ्यात हात घालणारे कोणी नाही
कानमध्ये हळूच गुणगुण करत
केसामध्ये हात फिरवणारे कोणी नाही

भेट्याची ठिकाणे त्या जागीच आहेत
पण तिथे दिसणारे सगळे वेगळेच आहेत
तिथे जावून थांबावे असे आता वाटत नाही
कारण थांबण्यासाठी आता आपले कोणीच नाही

अजूनही फोन नंबर जुनाच आहे माझा
पण त्याचा आता काहीच उपोयाग नाही
फोन येतात त्यावर पण फोन येणाऱ्यामध्ये
तुझा नंबर मात्र दिसत नाही

आठवणी तुझ्या या अश्या येताच राहणार
पण तू माझ्यापाशी नाही याची सल मात्र
नेहमीच मनामध्ये राहणार .

........................................अविरत
९:५५ am

माझ्या घरच्यांचा अपघात

आयुष्यात पहिलाच अपघात पहिला
डोळ्यासोमोर घरातले चिरडले गेल्याचा
हा थरारच बुद्धी सुन्न करून गेला

छोट्या बहिणीचा आवाज ऐकून
माझा जीवच निघून गेला
कोणाला वाचवू हेच मनाला समजेना
हे समजे पर्यंत तर दोन छोट्यांचा
जीवच देव घेवून गेला

डोळ्यात पाणी होते
आणि पायात अवसान नव्हते
कोणीतरी मदतीला यावे इतकेच
सरळ सोपे गणित होते

पण लोकांचे मन दगडा प्रमाणे होते
उभे राहून पाहण्यामधेच लोक सारे दंग होते
त्यांचे हे रूप पाहून माणुसकी संपल्याचे जाणवले
मग स्वताच शेवटी घरच्यांना वाचवण्याचे प्रयत्न चालू केले

जिवंत असणाऱ्यांना मग दवाखान्यात
नेण्यामधेच सारे गुंतले
आणि त्या दोन चिमुकल्यांचे देह
मात्र गाडी मधेच गुंतले

आज हि आठवण आली तर
डोळ्यात पाणी उभे राहते
पण राहिलेल्या मुलांच्या पदरी
तरी आई -बापाचे जीवदान टाकले
याचेच खूप धन्य वाटते

..............................
...............अविरत
०७/ ०१/ २०१०
११:०५ pm

शाळा

त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुध...