March 4, 2012

शाळा

त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते
इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत
गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुधा आहे
पण आपण त्यात कशातच नाही,
आपण त्या गाईच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्षासारखे अगदी मुक्त आहोत
यांच्या शाळेत जरी बसलो असतो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते
खास एकट्याची त्या शाळेला वर्ग नाहीत भिंती नाहीत फळा नाही,
पण त्यातले शिकणे फार सुंदर असते .......
......................................शाळा या चित्रपटातून खास आपल्यासाठी

December 17, 2011

जिवाभावाची ..... माझी खिडकी !


काही काही गोष्टीची स्वताची अशी वेगळी ओळख असते .......स्वतंत्र अस्तित्व असते त्याचं.अश्याच काही गोष्टी आपल्या नकळत आपल्या आयुष्याचा भाग बनून जातात. तशीच माझ्याआयुष्यात माझ्या नकळत माझी सखी बनलेली माझी खिडकी.

अगदी लहानपणापासून जेव्हा काही कळत हि नव्हते त्यावेळेपासून माझ्या साथीला असणारी माझ्या लहानपणापसून.तिचे आणि माझे हळुवार बंध कधी जुळाले काही समजलेच नाही आणि अगदी नकळत माणसांच्या नात्यातला ओलावा अगदी आमच्या दोघांमध्ये हि निर्माण झाला.

शाळेत असताना तिच्या जोडीला बसून केलेला अभ्यास,कॉलेज च्या मोरपंखी दिवसातल्या त्या आठवणी आणि त्यामध्ये जागवलेल्या रात्री अगदी सगळ्याची म्हणजे सगळ्याची माझी हि सखी एकमेव साक्षीदार आहे. आयुष्यात मनाला झालेल्या वेदना,दुःख पचवण्यासाठी हिने दिलीली साथ अगदी शब्दांच्या पलीकडचीच.

गंमातीचा भाग म्हणजे मी जेंव्हा खिडकी मध्ये बसतो ना अगदी ऐसपैस.........मांडी घालून तेव्हा मला सगळी खालची वेगवेगळ्यातरेची माणसे,त्यांची पळापळ,भांडणे सगळे काही दिसते पण मजा म्हणजे मी कोणालाच दिसत नाही त्यामुळे मस्त पैकी timepass होऊन जातो आणि हे सगळे करताना हाताला चहाचा कप तोंडाला लावत दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो.

बदलत्या ऋतूतले निसर्गाचे रंग या खिडकीतून इतके काही अनुपम दिसतात कि बस ! बेधुंद पावसाचे थेंब हातावर झेलायला जी काही गंमत आहे ती काही औरच. थंडी मध्ये अंगावर पडणारा तो गार वारा आणि पौर्णिमाच्या रात्री दिसणारा तो चांदोमामा हे सारे पाहताना वेळे काळेचे भान हि राहत नाही ........


अशी जीव-भावाची सखी मिळ्याला भाग्य लागत !मी खूप लकी आहे त्या बाबतीत !!!
........आणि तुम्ही ?


September 24, 2011

मनातला ओलावा
नजरेतला  इशारा
तुला पाहताच अंगावर
येणारा शहरा

कधीतरी तुला प्रेम माझे कळेल का .......
बोलण्यातला गोडवा
वागण्यातला आपलेपणा
सारे काही तुझ्यासाठीच
आहे तू फक्त माझी हो
बाकी सारे तुझेच आहे

July 6, 2011

मी कोण ?

सगळ्यांना मोठा प्रश्न पडला असेल ना कि ब्लॉग तर आहे पण ब्लॉग लिहिणाऱ्याचे नाव काय ?
हा हा हा हा
ओके tension नका घेवू मी चव्हाणांचा अविरत ,जन्माने सोलापूरकर पण सवयीने पुणेकर
कारण अहो आमचा जन्मच फक्त सोलापूरचा बाकी आम्ही लहानपणापासून पुण्यातच मोठे झालो आहे.
आमच्या वयाची २३ वर्ष ओलांडली असून सध्या संगणक शास्त्रामध्ये उच्च शिक्षण (P.G) कष्ट आम्ही करत आहोत

दिसायला तसा बरा आहे पण अजून तरी कोणत्या मुलीला आवडलो नाही असे म्हण्यापेक्षा आम्हालाच
कोणी आवडले नाही.
           तसा एक वि
रंगुळा म्हणूनच मी २०१० मध्ये ब्लॉग चालू केला कारण आपल्या आजूबाजूला जे काही चालले
आहे ते कोठेतरी मांडावे अशी एक सुप्त इच्छा होती आणि ती या ब्लॉग मधून पूर्ण झाली.
           मी लिहिलेले तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो आणि हो आवडले तर प्रतीक्रिया दयाला विसरू नका  




हे माझे मलाच माझ्याबद्दल पडलेले काही प्रश्न आणि त्याची माझ्याकडून मिळालेली उत्तरे जसे आठवतील तसे लिहित जातो ........

१) माझ्या आयुष्याचे आयडॉल
  माझे आई बाबा आणि आमचे छत्रपती शिवाजी राजे
२) माझी आई
    हाडाची शिक्षिका पण तरही खूप प्रेमळ कष्टाळू कशाला नाय म्हणत नाय ती आपल्याला
   (लहानपणी गणिते शिकवताना तिने मारलेली पिठाच्या हाताची चापट आज हि लक्षात आहे )
३) माझे स्वप्न
  ते मला फक्त रात्रीच पडते आणि सकाळी बेड वरून उठताच अंघोळी बरोबर वाहून जाते
४) After  ५ years मी कुठे असेल
  पार्किंग ला BMW  लावून स्वताच्या बंगल्यात सुंदर(त्या शिवाय लग्नच करणार नाही ) अश्या बायको बरोबर किचेन मध्ये कामात busy
५) मी कुठे मोठा झालो
  आपल्या पुण्यातच हो म्हणजे सांगावी गावात
६) माझे मित्र
   खूप सारे मित्र आहेत आपल्याला मैत्री करायला  फार आवडते (पण मुलींशी नाही पटत आपले जास्त ) कारण त्या शिवाय जीवन मजेशीर नाही हो .....
७) missing  someone
     हा कभी कभी मेरे दिल मै ख्याल आता हे वो होती तो कैसा होता .........
८) माझे bedrrom
   नेहमी आवरलेले clean आणि माझ्या कॉम्पुटर बरोबर त्याची ती शोभा खूपचं छान दिसते
९)माझे आवडते पुस्तक
  खूप आहेत माझ्याकडे कपाट भरले आहे मी वाचलेल्या पुस्तकांचे आता त्यातून निवडणे खूप अवघड आहे
10) माझे आवडते खाद्य
    खाण्याच्या बाबतीत मी पक्का पुणेकर आहे पण तरही त्यातल्या त्यात  भात वरण, मासे, चिकन चा कुठला हि पदार्थ आपल्याला जाम आवडतो
११) माझा आवडता brand
    wrangler ,levi's & zodiac
१२) माझ्या आवडीची वेळ
   रात्री ११ नंतर
१३) माझा आवडता गायक आणि संगीतकार
  खूप आहेत हो सांगता येणे म्हणजे अवघड आहे कारण संगीत हा आपला खूप वीक point आहे
१४) माझा आवडता नेता
    राज ठाकरे आणि आपले शरद राव (भ्रष्ट असले तरही राजकारणाच्या बाबतीत त्यांचा हात कोणी धरणार नाही )


 


 


July 4, 2011

ज्यांच्या शिवाय हे जीवनच अधुरे आहे ..........................


"समाजाच्या आरोग्यासाठी अविरत झटणारा असा डिप्लोमा Pharmacy ग्रुप ........"कारण त्याशिवाय यांना पैसे कसे मिळणार"

आमचे Pharmacists मंडळ 
Computer Doctor




संगीत वादक निरंजन 












कुणालभाऊ
                   
राहुल बहीरट उर्फ "काका "
                       






अर्धवटराव "हरिप्रसाद "
सांगलीचा रजनीकांत "सुर्यकांत पाटील "

                      
                         
                            




भोसले पाटील
             











लंगोटी मित्र  गिरीशदादा नागाने उर्फ "नागू "


 
                                                                                                                                                                                    

July 1, 2011

कर्माचा सिद्धांत

हिराभाई ठक्कर यांचे "कर्माचा सिद्धांत "हे पुस्तक वाचनात आले अतिशय सुंदर असे हे पुस्तक कर्मा बदल खूप काही सांगून जाते. आपल्या कर्माची फळे आपल्याला कशी भोगावी लागतात ती नियती कडून कशी वसूल केली जातात आणि कोणी किती जरा मोठा असला तरी त्याला शेवटी कर्माचे फळ हे भोगल्या शिवाय सुटका नाही हे या पुस्तकात अगदी समर्पक उदाहरणे देवून पटवून दिले आहे गीतेची उदाहरणे तर फारच सुंदर आहेत . सगळयांनी आवर्जून वाचावे आणि त्या प्रमाणे आपल्या वागण्यात बदल करावा उगाच मिळालेल्या आयुष्याला दोष देत ते घालवण्या पेक्षा चांगले कर्म करून निदान पुढच्या जन्मात तरी चांगले आयुष्य मिळावे यासाठी प्रयतन करावे कारण जे आता आहे ते सगळे मागच्या जन्माचे भोग आहेत मग ते चांगले असो वा वाईट हे ते पुस्तक वाचल्यावर समजते त्यात ते म्हणतात -:
"कर्माची गती खरोखर अति गहन |
आम्ही दोघे एकाच गुरुचे शिष्य ||
पण तो श्रीकृष्ण झाला पृथ्वीपती |
माझ्या घरात खायला नाही माती ||
गोकुळात त्याने केल्या अलोकिक लीला |
माझ्या बरोबर गुरूगृही आणितसे समिधा ||
आज तो बसला आहे सिंहासनावर |
माझ्या हाती मात्र चिपळ्या एकतारी || "

January 7, 2011

माझा महाराष्ट्र

गर्जा हा महाराष्ट्र ,रांगडा हा महाराष्ट्र ,
कुशल हा महाराष्ट्र ,लाल मातीतला हा महाराष्ट्र ,
सह्याद्रीच्या कुशीतला महाराष्ट्र ,
'आदर्श' कलंक लागलेला महाराष्ट्र ,
आत्महत्याने ईवळणारा महाराष्ट्र ,

राज्यांचा महाराष्ट्र , जोतिबांचा महाराष्ट्र ,
शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र ,
बारामतीकरांनी ने विकलेला महाराष्ट्र ,
धमक असताना बाईची चाकरी करणारा महाराष्ट्र ,

भाषेसाठी लढणारा महाराष्ट्र ,
इतिहास साठी भांडणारा महाराष्ट्र ,
पण शिक्षणापासून वंचित महाराष्ट्र ,
अंधारे भविष्य धाखवणारा महाराष्ट्र ,

पाण्यासाठी नुसतेच भांडणारा महाराष्ट्र ,
वेगळ्या विदर्भाची मागणी करणारा महाराष्ट्र ,
पण ज्यांनी हि " वाईट सत्कर्मे " केली ,
त्यांच्या पाठीशी सदेव उभा राहणारा
" जय महाराष्ट्र "

( हि कविता आधीचा महाराष्ट्र , आणि आताचा महाराष्ट्र याच्यावर करण्यात आली आहे
तरी त्याचा कोणी गैर अर्थ काढू ने)

...........................अविरत
७/०१/२०११
१:०८ pm

December 8, 2010

मैञिणीचा मित्र

आज काहीसे वेगऴेच झाले
माझे मन जुन्या आठवणीने भरून आले

मग काय पहिल्यांदा प्रेमाची कबुली दिली
त्या जागेला भेटून यावे असे वाटले

अपसुकच गाडीचे हँनङल तिकड़ वळालं
गाड़ी वरुण उतरताच समोर तिचे दर्शन झाले

मला वाटले देवानेच हे सर्व घडवून अणले
म्हणुन मी मनापसून त्याच आभार मानल

मी तिला पाहिल तिने मला पाहिल
मी पुढे जाणार इतक्यात आमच्या
मधी कोणी तरी अवतरल


तो दूसरा तीसरा कोणी नव्हता
माझ्याच मागच्या बाकावर बसणारा
आमच्याच वर्गातला माझाच मित्र होता

..................अविरत
९/१२/२०१०
११:१८ pm

November 11, 2010

"तुझ्यासाठीचे प्रेम"

तुझ्या आठवणीने आज मन
आभाळा सारखे भरून आले
आणि मनातले प्रेम मात्र डोळ्यातून
पाऊस धारा सारखे बरसू लागले

का सोडून गेलीस मला
हेच मला समजत नाही
प्रेम कोठे कमी पडले माझे
हेच मनाला उमजत नाही

नाही म्हणाले तरी तुझी
आठवण आल्याशिवाय राहत नाही
डोळे किती जरी मिटले तरी
डोळ्यासोमोर तू आल्याशिवाय राहत नाही

दगडाच्या घाव प्रमाणे मनाचे
तुकडे करायला तू विसरली नाही
पण इतके होऊन हि तुला
विसरायला माझे मन अजून हि तयार होत नाही

...................अविरत
२८/०१/२०१०
५:५० pm

October 30, 2010

. प्रार्थना

झोळीचे ना ओझे व्हावे
इतुकेच मज देई देवा
मन शांतीने भरुन राहो
कुणाचाही ना वाटो हेवा

दिवसा वर्षावी तू बा
मजवर उन्हाची माया
रात्री डोके ठेवताच क्षणी
निद्राधीन व्हावी काया

आग वैर अन सुडाची
कधीही नकोच पोटी
गाणे फक्त आनंदाचे
सदोदित यावे ओठी

उरात माझ्या वाहत राहो
नित्य चैतन्याचा झरा
नको मुखवटा चेहर्‍यावरी
जो दिला तू तोच बरा

कोणावरती नको असूया
कोणावरती नको रुसावा
लहान वा मोठा कोणी
चेहरा त्यासी हसावा

मरणाची मज नको भीती
पण जगण्याचा ध्यास हवा
नको मज पांडीत्य वेदांताचे
पण जीवनाचा अभ्यास हवा

मज जगण्याचे सामर्थ्य हवे
कुणावर माझा भार नको
पायवर मी उभे रहावे
कुणाचाही आधार नको

पक्वान्नाचे ताट नको
कष्टाचे पुरे दोन घास
नको ऐशारामी जगणे
कष्टाची मी धरावी कास

........विनायक
(मला हि कविता खूप आवडली म्हणून मी ती इथे मांडतो आहे )

October 20, 2010

अचानक बरसणाऱ्या पावसाचं

अचानक बरसणाऱ्या पावसाचं
देखील स्वागतच असतं.
अणू-रेणू सुखावणाऱ्या अमृताचं
कौतूक धरतीला उमगतं.

हातचं राखून ठेवणाऱ्याला
काहीच मिळत नसतं.
तोलून मापून चालणाऱ्या
सुख हुलकावण्या देत रहातं.

खऱ्या प्रेमात काही द्यायचंही नसतं
काही घ्यायचं ही नसतं.
क्षणभर मिठीत विसावायचं असतं
क्षणभर सत्य विसरायचं असतं

October 13, 2010

What is love?

What is love?

Love is when my mom
comes to me at night and say
“beta I love u ……“

Love is when I come back
from Work and papa says
“beta ,late hone wala tha to call kar deta…..?

Love is when my bhabihi says,
“oye hero,ladki-wadki patai ki nahi ….?”

Love is when my sister says
“Bhai, meri shadi ke baad mujase
Jhagade kaun karega .?”

Love is when I m moodless
And my brother Says ,
“chal kahi ghumane chalte hay “

Love is when my best friends call me and says ,
“kamine ….!tere bina dil nahi lagata”

That’s love don’t miss in life
Love is not only having GF or BF
Dis love is better than having GF or BF

September 6, 2010

अधुरे प्रेमपत्र .....

वळणा मागून वळण मागे पडत राहतात
कोठेच नसते ती पण नजरा तिला शोधत राहतात

अशीच एकदा कॅन्टीन मध्ये दिसली असता
हजारोंना सोडून नजरेला तिच्या नजर भिडली असता

काय वाटेल तिला, राग येईल का तिला असे प्रश्न पडले असता
आणि दिवसा मागून दिवस त्या वळणावरच मळून गेले असता

कधीच समजले नाही तिला मला काय म्हण्याचे आहे
मग वाटले समोरा-समोर बोलणे नाही निदान पत्रातून तरी सांगावे

पण वाटले तिला नाही आवडले तर .............
मग वाटले जावू दे तिच्या कोमल हातामध्ये देण्याचे तरी नशिबी यावे

खूप प्रयतन करून त्या रात्री पत्र लिहिले होते
पहिल्यापसून शेवट पर्यंत १०० वेळा वाचले होते

शब्दांत न उतरणाऱ्या भावना शब्दांत उतरवण्याचा प्रयतन करत होतो
आणि लिहिता लिहिता तिला माझ्या मिठी मध्ये बघत होतो

दुसऱ्या दिवशी ती आलीच नाही,
उद्या येईल म्हणून ती रात्र काही सरलीच नाही

दुसऱ्या दिवशी तिची मैञीण येताना दिसली
मला पाहून जरा दूरवरच थांबली .......

हातातली चिठ्ठी पाहून म्हणाली द्याला फारच उशीर केला रे
आता ती आपल्या सारण्याच कायमची सोडून गेली

...................अविरत
०६/०९/२०१०
११:१९ pm

आजकालची fashion

comfortable नसता तर आखूड
कपडे घालताच कशाला नंतर
उगाच त्याला खाली वर वडून
त्याची size वाढवता कशाला

जितकी कमी कपड्याची size
तितकी त्याची किमत जास्त आहे
किमत कपड्याची देतात कि
अंगप्रदर्शनाची हे मात्र त्यांची
त्यांनाच माहित आहे

साडी डे साजरा केला म्हणजे
संस्कृती जोपसली जाते असे नाही
पण jeans T -shirt मध्ये पण साडी
चा आदर असणे म्हणजे संस्कृती
कळली हे मात्र नक्की आहे

globalization च्या नावाखाली
काही पण विचित्र वागू नका
आज तुम्ही कपडे घालून तरी
फिरता आहात उद्याची पिडी
तशीच फिरली तर आदिमानवाचे
globalization झाले असे काही
म्हणून नका

(हि कविता कोणच्या भावना दुखावण्यासाठी लिहिली नाही तरी ती वाचून त्याचा
आशय समजून घ्यावा हि विनंती )

...........................................................अविरत
२४/०२/२०१०
१०:०७ am

July 19, 2010

प्रेम इतके अवघड का असत

प्रेम इतके अवघड का असत
समजायला आणि उमजायला
इतकं जड जड का असत

असं काय असते त्यात कि
तिला पाहताच मनामध्ये
विचारांच काहूर माजत

चार दोन भेटीमध्येच
तिच्या आणि आपल्या
आयुष्याचा स्वप्न रंगवल जातं

मग पुन्हा फक्त डोळ्या
डोळ्यानीच बोलणं होता
मना-मानतच सारं जुळून जातं

एके दिवशी आपली जागा
दुसरच कोणीतरी घेता
आणि प्रेम सारं हृदयातच विरून जातं

म्हणूनच प्रेम हे अवघड असत
झालं तर सोप असत आणि
ठरवून केलं तर अवघड असत

...................अविरत
१९/०७/२०१०
१०:४८ pm

July 12, 2010

मी तूझा कोण आहे?

सगळीच नाती जगाच्या
नजरेतून पहायची नसतात
मग त्यात आपलं असं
काहीच उरत नाही

तुझं नी माझं नातं
ही असंच आहे
स्नेहाच्या नाजूक
धाग्यात गुंफ़लेलं

या नात्याला तू
नावात गुंतवू नकोस
कारण इथंवरच
नाती संपत नसतात

मी तूझा कोण आहे?
या प्रश्नाला जरी
उत्तर नसलं तरी
तू माझी आहेस
इतकंच पुरेसं नाही का?

July 9, 2010

कधीतरी वाटतं यार,

कधातरी वाटते यार
या खांद्यावर डोके
ठेवून कोणीतरी रडावं
कॉलेज संपल्यावर पण
कोणीतरी आपल्यासाठी थांबावं

ज्या स्वप्नांमधे माझ्या
साऱ्या रात्री जागतात
त्याच स्वप्नात हरवून
तिला देखील जगावंसं वाटावं

माझे असू पुसून तिने
आमच्या सुखात हसावं
कधीतरी वाटतं यार,
आपलंही कुणीतरी असावं!

छोट्या छोट्या गोष्टींमधे
खोटं खोटं चिडावं पण,
भेटीनंतर निघते म्हणताना
तिचं पाऊल अडावं


July 8, 2010

स्पर्श

तुझ्यासाठी पाऊस पडतो
हा होऊनी बेभान
स्पर्श करतो तुला
वारा हरवूनी भान

ओघळणारे थेंब गालावरती
प्रयत्न् करती थांबण्याचा
अस्तित्व विसरुनी स्वताचे
प्रयतन करती मोती बनण्याचा

मलाही वारा होऊनी तुला
स्पर्श करावा असं वाटतं
थेंब बनुनी पावसाचा
तुझ्या गालावरती थांबावसं वाटत

..............अविरत
08/07/2010
11:30pm

June 25, 2010

माझे आयुष्य

आयुष्याचा अर्थ काही अजूनपर्यंत उमगला नाही
शाळेत असताना अभ्यास काही कळला नाही
सरांच्या शिव्या खावून शाळा सारी संपून गेली
लहानपणाची मजा सारी तिकडेच निघून गेली

शाळेनंतर कॉलेजचे रंगारंग जीवन सुरु झालं
पोरी पाहण्यामधेच सगळे वर्ष निघून गेलं
खूप मोठे कोणीतरी व्हावे असे नुसते वाटत राहिले
ते राहिले बाजूला पण जे आहे तेच टिकवणे अवघड झाले

नोकरी साठी मग कॅम्पस देणे आले
पण मार्क कमी म्हणून त्यांनी पण हाकलून दिले
आमचे सारे मित्र select झाले
पण आम्ही मात्र fail झालो

तेव्हा आयुष्याचे एक गुपित कळले
कोणी कोणाच नसतं आणि स्वताचे
आयुष्य स्वतालाच जगायचं असतं

................अविरत
२५/०६/२०१०
११:४० pm

June 24, 2010

धारावी झोपडपट्टी   

सहजच कामानिमित मुंबईला जाणे झाले,तसे मुंबई माझ्यासाठी काही नवी नाही अनेक वेळा जाणे-येणे होत असते पण या वेळेस पहिल्यांदाच मुंबईला पावसाळ्यात जाणे झाले. आज पर्यंत जे काही ऐकले होते किंवा टि.व्ही . वर पाहिले होते ते एकदम प्रत्येक्ष पाहिला मिळाले. वरून पडणारा पाऊस ,रस्त्यावरून वाहणारे पाणी ,वाहनांच्या रांगा आणि त्यातून वाट काडणारी मुंबईकर मंडळी.
त्याच वेळेस धारावी च्या काही झोपड्यामध्ये जाणे झाले आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा जिचा नावलौकिक आहे चित्रपटात पाहिलीली, पेपर मध्ये वाचलीली धारावी झोपडपट्टी आज इतकी जवळून पाहत होतो. पाऊस पडताच साऱ्या जगाला आनंद होतो, पाऊसात फिरयाला जाण्याचे प्लान आखले जातात, प्रेम गीते सुचतात हा आज पर्यंतचा माझा अनुभव होता. पण इकडे परिस्तिथी जरा वेगळीच होती........
पाउस पडायला लागला की यांचे मन चिंताक्रांत होते,घरात येणाऱ्या पाण्याला कसे अड़ावयाचे याचे प्लानिंग सुरु होते,जमवलेला संसार कुठे ठेवायचा याने विचारांचे काहुर माजते,जेवणाची चुल देखिल बंद होते आणि जो पाउस जगाच्या डोळ्यात आनंद आणतो तोच यांच्या डोळ्यात मात्र पानी आणतो. सारया जगाची घाण वाहून नेणाऱ्या गटारीचे पानी घरात आल्यावर सुधा धीर खचू न देता तसल्या घाणित सुधा  रात्र काड़ाने म्हणजे खरच दिव्य म्हणावे लागेल. फास्ट ट्रैक वर धावणारी जिंदगी मात्र इकडे आली कि स्लो ट्रैक वर येते. तरी पण इथली लोके कोठल्याही प्रकारची तक्रार न करता जीवनाकडे एक वेगळ्याच नजरेने बघतात हे लक्षात आले तिकडे एका बरोबर बोलने झाले त्यावेळेस तो म्हणाला कि 
"सहाब कटिंग पिते समय अर्धा ग्लास खाली हे  ये हम कभी नहीं सोचते, 
जो भरा हे उतना हि आपणा हे " 
या विचाराने मला आयुष्याचे  एक सूत्रच दिले आणि मग मुंबई ची कहाणी समजली इथला प्रत्येक माणूस याच सूत्रावर जगतो आणि म्हणून तो कोणत्या पण संकटाला सामोरे जायला तयार असतो.

शाळा

त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुध...