June 17, 2010

एक बार

एक बार वळून पाहिलेस,
होश हरपले बेहोश मी
एक बार वळून नजर मिळवलिस,
नजरेत तूझ्या फ़क्त मी
एक बार वळून भेटलो पुन्हा,
गुलाबी क्षनात तू अन् मी
एकदा पुन्हा स्वप्न माझं तुट्लं,
हरवलिस कोठेतरी
आणि शोधतोय मी

June 13, 2010

पहिला पाऊस

पहिला पाऊस
पहिली सर
प्रेमाची नशा
चढली अंगभर

पहिला पाऊस
पहिली सर
तिच्या मिठीची
आली आठवण

पहिला पाऊस
पहिली सर
तिच्या बरोबरच्या
चहाची चव आली तोंडावर

पहिला पाऊस
पहिली सर
आली पहिल्या
प्रेमाची आठवण

.........अविरत
१३/०६/२०१०
११:२७ pm

प्रश्न के साथ रहो

"मेरे जीवन का क्या उद्देश्य है?" यह एक प्रश्न हमारे system में, हमारी आत्मा में मानवीय मौल्यों को प्रकाशित करता है. परन्तु इस प्रश्न के उत्तर को पाने में जल्दी मत करो. प्रश्न के साथ रहो. प्रश्न अपने में एक औजार है जिसके सहारे तुम अपने अन्दर की गहरी में उतर सकते हो.

तु नसताना ................

तु असताना तुझाशी,
खुप खुप बोलायचं ठरवतो,
मुक्या भावनांना,
शब्दात बसवायचं ठरवतो,
चार ओळी जोडुन
कवीता करायची ठरवतो,
पण तु आलीस की,
शब्द अबोल होतात,
मन मात्र बोलयला लागत
तु नसताना मात्र
मुक्या भावनांनचे शब्द होतात,
आपसुक चार ओळींची कविता होते,
एक गोष्ट मात्र नक्की
तुझ्या असण्यापेक्षा तुझ्या,
नसण्यातच माझं जास्त जगन होतं

June 4, 2010

प्रेम 
 जूनच्या सुरवातीलाच पावसाने हजेरी लावली आणि उन्हाने पोळलेल्या मनाला मग अचानक प्रेमळ माणसाची जाणीव झाली आणि हातात हात घालून फिरायला एका प्रेमाची गरज वाटू लागली आणि अचानक दोन ओळी आठवल्या .............
"थेंबा थेंबाने पावसाच्या अंग माझे शहारून गेले
आगमनाने तिच्या माझे प्रेम उजळून गेले "
प्रेम म्हटले कि प्रत्येकाच्या ओठावर नाजूक हसू आणि मनात गारवा निर्माण होतो. आणि पावसाळा म्हणजे जणू प्रेमाचाच ऋतू .निसर्गसौंदर्य न्याहाळताना अचानक आलेला पाऊस त्या अचानक आलेल्या पावसात तिचे ते भिजलेले रूप, पावसापासून वाचण्यासाठी तिची चाललेली ती धडपड वीज चमकताच मारलीली मिठी सारे कसे स्वर्गातील आनंद देणारे वाटते आणि प्रत्येकाला ते हवे हवे से वाटते.पण हे त्यालाच मिळते ज्याच्याकडे खरे प्रेम आहे पण जर कोणी हे सारे मिळावे म्हणून जर प्रेम करायला लागला तर "प्रेम" या भावनेलाच धक्का लावत आहे .प्रेम हे कधी ठरवून होत नाही तर ते व्हावे लागते. प्रेम कधी शब्दात सांगता येत नाही तर ते जाणवावे लागते ........प्रेम म्हणजे नक्की काय असते ते केल्याशिवाय कळत नाही.प्रेम हे कधीच एकाकडून होत नाही त्याला गरज असते ती जोडीदाराची मग तो जोडीदार कोणत्याही रुपात असला तरी त्याला त्याच्याशी काही घेणे देणे नसते .प्रेम एक भाषा आहे त्यात आस आहे जीवाला ओढ आहे ध्यास आहे आणि त्याग हि आहे पण हे आजकालची मुले-मुली हे सारेच विसरले आहेत प्रेम हि एक Fashion झाली आहे ती करते मग मी का नको अश्यांनी कधीच प्रेम होत नसते ते असते फक्त एक "आकर्षण " .प्रेम कोणावर,किती आणि कसे करावे हे अजून मुलांना समजलेच नाही. Picture पाहून यांना पण प्रेम म्हणजे एकदम साधे वाटू लागते - वर्ष बरोबर फिरल्यावर मग यांना ते एक बंधन वाटू लागत,फास वाटू लागतो आणि मग एक मोठा प्रश्न उभा राहतो आता काय ?
प्रेमात एकमेकांना समजून घेणे फार महत्वाचे असते त्यात कोणताही स्वार्थ नसावा पुढच्या व्यक्तीचा आदर असावा पण आजचे प्रेम सारे उलटेच आहे "तू नाही तो दुसरी सही .........."हा आजचा फंडा आहे. एकमेकावर प्रेम करून तर प्रेम वाढते एकमेकांची मने जिंकणे हा तर प्रेमाचा आत्मा आहे. प्रेम कोणावर करावे हे जरी ज्याच्या त्याच्या मर्जीवर असला तरी प्रेमकोणावर करावे हि एक खासियत असली पाहिजे .प्रेम हि माणसाची गरज आहे तो किंवा ती या ना त्या स्वरूपाच्या रुपात एकमेकांना शोधात असतात.आपल्याला जी व्यक्ती अगदी हृदयापासून आवडते असे वाटते,कि या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करावं तर मग खुलम-खुला प्रेमाचा स्वीकार करा आणि नुसते प्रेम करू नका तर त्यात उभारी घ्या "तू समोर असलीस कि नुसताच तुला बघणं होत आणि तू नसताना तुझ्यासोबत जगणं होत "
चंद्रशेखर गोखलेंच्या या सुंदर कल्पनेतील "जगणं "चा अर्थ ज्या व्यक्तीबद्दल गवसतो त्याच्यावर मनापासून प्रेम करा.कारण ज्याला हा अर्थ गवसतो तो किंवा ती स्वतच्या धुंदीत असतात त्यांना कोणताही बंध अडकवत नसतो ......
तो 'तिच्यावर 'किंवा ती' त्याच्यावर ' मनापासून प्रेम करत असते कारण तो किंवा ती त्याच्यासाठी किंवा त्याच्यासाठी सर्वस्व असते .............

May 15, 2010

आज महाराजांबद्दल लिहण्यास कारण म्हणजे नुकताच महाराष्ट्र दिन साजरा झाला ज्या महाराष्ट्राला घडवण्यात मोठा वाटा असणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले.पण आज त्याची आठवण किती जणांना आहे याचीच शंका येते प्रत्येक जण नुसते त्यांचे नाव स्वतच्या स्वार्थासाठी  वापरतो आहे .मग कोणी राजकारणासाठी तर कोणी स्वताला प्रसिद्धी मिळवण्यासाठी .आज प्रत्येक जण उठतो आहे आणि आपल्या सवडी प्रमाणे त्यांची जयंतीसाजरी करतो आहे आणि मग त्यातून आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या मोठ्या मिरवणुका, अनेक कार्यक्रम, अनेक शिबीरे आणि मग त्याच्यातून स्वतःची पोळी भाजून घेण्यावर सगळ्यांचा भर.पण महाराजांबद्दल आस्था असणारे फार थोडे लोक आढळतात कि ज्यांना काहीना काही करण्याची उर्मी असते पण त्यांचे ऐकणारे कोणी नसते . मला तर एक काळात नाही हे अश्या प्रकारे सिनेमाची गाणी लावून दारू पिवून नाचले म्हणजे अभिमान दाखावाल्यासारखे होते का ? आज किती जण असे आहेत कि जे खरेच या विचारांनी प्रेरित आहेत. स्त्रीबदल आदर , मातृभूमीबदल प्रेम, प्रत्येक धर्माबद्दल आदर याची तर कोणाला काडी मात्र जाणीव नाही. धर्मवीर संभाजी महाराजांची  जयंती देखील नुकतीच साजरी झाली त्या वेळेस एक मिरवणूक पहिली तर त्या मिरवणुकीत "सात समुंदर पार मे तेरे पिचे पिचे" हे गाणे ऐकले आणि अंगावर काटाच उभा राहिला नेमकी मिरवणूक कशाची हा प्रश्न उभा राहिला ?
जयंती असते कशासाठी हेच ९०% लोकांना माहित नाही. होऊन गेलेल्या थोर लोकांचे स्मरण राहण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत या गोष्ट पोहोचण्यासाठी, त्या लोकांचे विचारांचे स्मरण आणि आचरण करण्यासाठी जयंती साजरी करावी पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढून आदर्श समाज घडवावा हि एक साधी अपेक्षा 


May 6, 2010

"लाईटचा आहेर"

सुट्टी साठी सहजच गावकडे जाणे झाले. एके दिवशी काही काम नाही म्हणून मामाच्या दुकानातील माल पोचवण्यासाठी त्याच्या बरोबर निघालो.
आभाळ भरून आले होते ,विजा चमकत होत्या थोडे पुढे गेलो आणि पावसाचा मारा सुरु झाला. माल टाकण्यासाठी गेलेले गाव अत्यंत आडरानी होते.
कधीतरी एखादी गाडी रस्त्यावरून जाताना येताना दिसत होती.त्या अवेळी आलेल्या पावसात हि आम्ही दोघे माल टाकून परत निघालो.
परतीचा मार्ग चालू झाला तरी पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता , गाडीचा वेग हि आता बऱ्यापेकी मंदावला होता. अंधाराचे साम्राज्य पसरत चालले
होते चमकणाऱ्या विजा त्या अंधारला दूर करण्याचा जणू प्रयतनच करत होत्या. आम्ही मात्र त्यांचा चाललेला खेळ पाहत गाडीच्या दिव्यात कसाबसा रस्ता
काटत होतो. त्याचवेळेस अचानक एका झाडाखाली कोणीतरी गाडीला हात दाखवत आहे असे दिसले गाडीचे ब्रेक लावले गाडी थांबली त्या झाडाखाली एक माणूस
चिंब भिजलेल्या अवस्थेत उभा होता. मी त्याला विचारले काय काम आहे ? तर गावकडे यायचे आहे म्हणाला आम्ही त्याला होकारार्थी मान हलवली त्यावेळेस
त्याच्या तोंडावर उठलेले हास्य काळीज चीर करून गेले आणि आज महाराष्ट्रच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सरकार किती खेड्यापर्यंत पोहचले आहे याचे एक उदाहरणच
देवून गेले
तो काही एक विचार न करता पटकन गाडीत चढला आणि पाठीमागे समान ठेवायच्या जागी जावून बसला . गाडी पुन्हा चालू झाली थोड्या वेळाने मागे असलेल्या
खिडकीतून तोंड घालून त्याने सांगीतले "नाक्यावर सोडा " मी त्याला हो म्हणालो. मग माझ्या आपल्या त्याच्याशी गप्पा चालू झाल्या मी त्याला विचारले इतक्या पावसात
कुठे निघाला मामा ? त्यावर त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे शहरात राहणाऱ्या माणसाला मारलेली सणसणीत चपराक होती ते म्हणाला " मालक पेरणी केली होती आताच , सार
घरबार राबल शेतात ........., खूप अपेक्षा होती येणाऱ्या पिकावर. यंदाच्या पिकावर या दिवाळीत मोठया मुलीचे लगीन करयचं होतं बघा पण हि लाईट म्हणजे जणू यमकाळ ठरली
आहे आमच्यासाठी १५-१६ तास नसते आणि ज्यावेळेस येते त्यावेळेस पाक कमी पावर ने येते त्याच्यावर घरातला बल्ब भी नीट चालत नाही तर विहिरीवरची मोटार काय खाक चालयची.
पाणी नाही मिळाल पिकला त्यामुळे नवीन रोप जळून गेलं बघा आता परत बी आण्याच हाय आणि नवीन पेरणी करयाची हाय निदान हा पाऊस तरी काय तरी करल इतकीच अपेक्षा .
तुमच बर हाय नाय का २४ घंटे लाईट असती नव्ह का ? कारखान असतात तुमच्याकड म्हणून २४ घंटे लाईट आणि आमच्याकड काहीच नाही व्हये ? पण मालक तुमच्या कारखान्यातली
माणसं काय हवेवर जगतात काय पोट भरायाला तर आम्हीच पुरवतो की धान्य मगच ताकदीनं काम करतात ती मग लाईट ची गरज कोणाला हाय ? लई नको पण पाहिजे तितकी तरी द्या की
तुम्हाला टी.वी,टेप, थंड हवेच मशीन लावयला लाईट हाय आणि आम्हाला पाण्यापुर्ती सुद्धा नाही असं का ?"
त्यांचे बोलणे चालू होते तितक्यात नाका आला गाडी थांबली मामा उतरले आणि सदऱ्याच्या खिशात हात घालत पैसे पुढे करू लागले मी नकारअर्थी मान हलवली तरी ते आग्रह करत होते
"कोणाचे फुकट उपकार घेत नाही आम्ही" म्हणत हात तसाच पुढे करून उभा होते तितक्यात गाडी हलली आणि आम्ही पुढे आमच्या वाटेकडे निघालो मामा नजरे आड होई पर्यंत मी त्यांच्याकडे
पाहत होतो परीस्थीने ग्रासलेल्या त्या माणसाच्या मनाच्या मोठेपणाने माझ्या डोळ्यात मात्र पाणी उभे केले होत त्यावेळेस मी ठरवले की जितकी शक्य आहे तितकी मदत या सर्वाना करयाची
कशी तर अनाआवश्यक लाईट वापर टाळून आवश्यक तितकी लाईट वापरून म्हणजे अश्या किती तरी शेतकरी बांधवांच्या मुलींच्या लग्नात दिलेला तो एक मोठा "आहेर" असेल नाही का ............

शाळा

त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुध...