April 24, 2010

माझा बाप

डोळ्या मध्ये स्वप्न घेऊन
बाप माझा पुण्यात आला
आणि या साऱ्या माणसांच्या
गर्दतीत तो पण सामील झाला

राहायला जागा नाही म्हणून
रोज एक स्टेशन फिरू लागला
पोलीस रोज मारतात म्हणून
रोज वेगळा बेंच पकडू लागला

ओले कपडे घालूनच रात्री
तो झोपू लागला कारण
एक जोडी शिवाय दुसरी
जोडच नव्हती अंगावर घालयला

बस ला पैसे जास्त लागतात
म्हणून २०कि.मी . सायकल
लागला चालवयाला आणि
पायाला गोळे येतात म्हणून
सुतळी बांधे पायाला

पैसे नव्हते जेवयाला मग
पाणी आणि पाव लागला खायला
भूक नाही भागली म्हणून
महारोग्याच्या लाईनित लागला खायला

आज पण नशिबाची साथ नाही
तरी पण बाप माझा लढतो आहे
जगातल्या प्रत्येक सुखाची
किंमत माझ्यासाठी मोजतो आहे

बापा बदल लिहताना पाणी माझ्या डोळ्यात आले
सारे कसे सुन्न झाले आणि बापाच्या प्रत्येक
कष्टाचे चांगले फळ माझ्या नशिबी आलं................

..............................
..................अविरत
०८/०१/२०१०
१०:५४ pm

No comments:

Post a Comment

शाळा

त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुध...