जाई जूई च्या वेलीवरती
गंध दाटुनी आला
तुला आठवूनी मला
पाहताच आरसा फितूर झाला
तुझ्या आठवणीतील रात्र ऐकली
आणि धुंद ओढ या जीवाला
मुक्त चांदणे तुझ्या स्पर्शाचे
आज आठवूनी कंठ दाटुनी आला
तुझ्या मिठीतील तो गारवा
आज अंगामध्ये जानावूनी आला
तुझ्या शिवाय आज
हा संसार नकोसा झाला
माझ्या स्पंदनातील श्वास तुझा
आणि प्रेमळ हाक तुझी
तुझ्या आठवणीचे हेच रस्ते
आणि किती अवघड वळणे घेती
...................................अ
२२/०४/२०१०
१०:४१ pm
No comments:
Post a Comment