मनसोक्त भिजण्याचा
शाळेला दांडी मारण्याचा
होडी करुन सोडण्याचा
आईचा धपाटा खाण्याचा
पाऊस तरुणाईतला
गाडीवर तिला घेवून फिरण्याचा
तिच्याबरोबर चिंब भिजण्याचा
एकाच ग्लासात गरम चहा पिण्याचा
पाऊस चाळीसीतला
हातात पुस्तक धरून
जुनी गीते ऐकण्याचा
बायकोच्या हातची भजी खात
जुन्या आठवणीला उजाळा देण्याचा
पाऊस म्हातारपणीचा
आराम खुर्चीवर बसून
स्वेटरची उब सोसण्याचा
आणि आभाळा कडे पाहताच
यमाची आठवण करून देणारा .....
...............अविरत
२३/०६/२०१०
११:५८ pm

Apratim .....
ReplyDelete