May 6, 2010

"लाईटचा आहेर"

सुट्टी साठी सहजच गावकडे जाणे झाले. एके दिवशी काही काम नाही म्हणून मामाच्या दुकानातील माल पोचवण्यासाठी त्याच्या बरोबर निघालो.
आभाळ भरून आले होते ,विजा चमकत होत्या थोडे पुढे गेलो आणि पावसाचा मारा सुरु झाला. माल टाकण्यासाठी गेलेले गाव अत्यंत आडरानी होते.
कधीतरी एखादी गाडी रस्त्यावरून जाताना येताना दिसत होती.त्या अवेळी आलेल्या पावसात हि आम्ही दोघे माल टाकून परत निघालो.
परतीचा मार्ग चालू झाला तरी पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता , गाडीचा वेग हि आता बऱ्यापेकी मंदावला होता. अंधाराचे साम्राज्य पसरत चालले
होते चमकणाऱ्या विजा त्या अंधारला दूर करण्याचा जणू प्रयतनच करत होत्या. आम्ही मात्र त्यांचा चाललेला खेळ पाहत गाडीच्या दिव्यात कसाबसा रस्ता
काटत होतो. त्याचवेळेस अचानक एका झाडाखाली कोणीतरी गाडीला हात दाखवत आहे असे दिसले गाडीचे ब्रेक लावले गाडी थांबली त्या झाडाखाली एक माणूस
चिंब भिजलेल्या अवस्थेत उभा होता. मी त्याला विचारले काय काम आहे ? तर गावकडे यायचे आहे म्हणाला आम्ही त्याला होकारार्थी मान हलवली त्यावेळेस
त्याच्या तोंडावर उठलेले हास्य काळीज चीर करून गेले आणि आज महाराष्ट्रच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सरकार किती खेड्यापर्यंत पोहचले आहे याचे एक उदाहरणच
देवून गेले
तो काही एक विचार न करता पटकन गाडीत चढला आणि पाठीमागे समान ठेवायच्या जागी जावून बसला . गाडी पुन्हा चालू झाली थोड्या वेळाने मागे असलेल्या
खिडकीतून तोंड घालून त्याने सांगीतले "नाक्यावर सोडा " मी त्याला हो म्हणालो. मग माझ्या आपल्या त्याच्याशी गप्पा चालू झाल्या मी त्याला विचारले इतक्या पावसात
कुठे निघाला मामा ? त्यावर त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे शहरात राहणाऱ्या माणसाला मारलेली सणसणीत चपराक होती ते म्हणाला " मालक पेरणी केली होती आताच , सार
घरबार राबल शेतात ........., खूप अपेक्षा होती येणाऱ्या पिकावर. यंदाच्या पिकावर या दिवाळीत मोठया मुलीचे लगीन करयचं होतं बघा पण हि लाईट म्हणजे जणू यमकाळ ठरली
आहे आमच्यासाठी १५-१६ तास नसते आणि ज्यावेळेस येते त्यावेळेस पाक कमी पावर ने येते त्याच्यावर घरातला बल्ब भी नीट चालत नाही तर विहिरीवरची मोटार काय खाक चालयची.
पाणी नाही मिळाल पिकला त्यामुळे नवीन रोप जळून गेलं बघा आता परत बी आण्याच हाय आणि नवीन पेरणी करयाची हाय निदान हा पाऊस तरी काय तरी करल इतकीच अपेक्षा .
तुमच बर हाय नाय का २४ घंटे लाईट असती नव्ह का ? कारखान असतात तुमच्याकड म्हणून २४ घंटे लाईट आणि आमच्याकड काहीच नाही व्हये ? पण मालक तुमच्या कारखान्यातली
माणसं काय हवेवर जगतात काय पोट भरायाला तर आम्हीच पुरवतो की धान्य मगच ताकदीनं काम करतात ती मग लाईट ची गरज कोणाला हाय ? लई नको पण पाहिजे तितकी तरी द्या की
तुम्हाला टी.वी,टेप, थंड हवेच मशीन लावयला लाईट हाय आणि आम्हाला पाण्यापुर्ती सुद्धा नाही असं का ?"
त्यांचे बोलणे चालू होते तितक्यात नाका आला गाडी थांबली मामा उतरले आणि सदऱ्याच्या खिशात हात घालत पैसे पुढे करू लागले मी नकारअर्थी मान हलवली तरी ते आग्रह करत होते
"कोणाचे फुकट उपकार घेत नाही आम्ही" म्हणत हात तसाच पुढे करून उभा होते तितक्यात गाडी हलली आणि आम्ही पुढे आमच्या वाटेकडे निघालो मामा नजरे आड होई पर्यंत मी त्यांच्याकडे
पाहत होतो परीस्थीने ग्रासलेल्या त्या माणसाच्या मनाच्या मोठेपणाने माझ्या डोळ्यात मात्र पाणी उभे केले होत त्यावेळेस मी ठरवले की जितकी शक्य आहे तितकी मदत या सर्वाना करयाची
कशी तर अनाआवश्यक लाईट वापर टाळून आवश्यक तितकी लाईट वापरून म्हणजे अश्या किती तरी शेतकरी बांधवांच्या मुलींच्या लग्नात दिलेला तो एक मोठा "आहेर" असेल नाही का ............

2 comments:

  1. खुप छान लिहिलं आहे .. वर नाव स्पंदन आहे .. याच बरोबर जाणीव हे नाव ही शोभेल .. निदान लेखकाच्या या स्पंदनांनी वाचणा-याच्या मनात जाणीव नक्कीच उत्पन्न होईल .. अशीच स्पंदने अविरत सुरु राहोत .. शुभेच्छा

    ReplyDelete
  2. U r away frm d calamities of villiage life , though in short u told the practl solution.
    and paid the attention toword the ATTITUDE of villiage people,
    Nice & Sensitive Blog , Keep it up

    ReplyDelete

शाळा

त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुध...