May 15, 2010

आज महाराजांबद्दल लिहण्यास कारण म्हणजे नुकताच महाराष्ट्र दिन साजरा झाला ज्या महाराष्ट्राला घडवण्यात मोठा वाटा असणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले.पण आज त्याची आठवण किती जणांना आहे याचीच शंका येते प्रत्येक जण नुसते त्यांचे नाव स्वतच्या स्वार्थासाठी  वापरतो आहे .मग कोणी राजकारणासाठी तर कोणी स्वताला प्रसिद्धी मिळवण्यासाठी .आज प्रत्येक जण उठतो आहे आणि आपल्या सवडी प्रमाणे त्यांची जयंतीसाजरी करतो आहे आणि मग त्यातून आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या मोठ्या मिरवणुका, अनेक कार्यक्रम, अनेक शिबीरे आणि मग त्याच्यातून स्वतःची पोळी भाजून घेण्यावर सगळ्यांचा भर.पण महाराजांबद्दल आस्था असणारे फार थोडे लोक आढळतात कि ज्यांना काहीना काही करण्याची उर्मी असते पण त्यांचे ऐकणारे कोणी नसते . मला तर एक काळात नाही हे अश्या प्रकारे सिनेमाची गाणी लावून दारू पिवून नाचले म्हणजे अभिमान दाखावाल्यासारखे होते का ? आज किती जण असे आहेत कि जे खरेच या विचारांनी प्रेरित आहेत. स्त्रीबदल आदर , मातृभूमीबदल प्रेम, प्रत्येक धर्माबद्दल आदर याची तर कोणाला काडी मात्र जाणीव नाही. धर्मवीर संभाजी महाराजांची  जयंती देखील नुकतीच साजरी झाली त्या वेळेस एक मिरवणूक पहिली तर त्या मिरवणुकीत "सात समुंदर पार मे तेरे पिचे पिचे" हे गाणे ऐकले आणि अंगावर काटाच उभा राहिला नेमकी मिरवणूक कशाची हा प्रश्न उभा राहिला ?
जयंती असते कशासाठी हेच ९०% लोकांना माहित नाही. होऊन गेलेल्या थोर लोकांचे स्मरण राहण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत या गोष्ट पोहोचण्यासाठी, त्या लोकांचे विचारांचे स्मरण आणि आचरण करण्यासाठी जयंती साजरी करावी पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढून आदर्श समाज घडवावा हि एक साधी अपेक्षा 


May 6, 2010

"लाईटचा आहेर"

सुट्टी साठी सहजच गावकडे जाणे झाले. एके दिवशी काही काम नाही म्हणून मामाच्या दुकानातील माल पोचवण्यासाठी त्याच्या बरोबर निघालो.
आभाळ भरून आले होते ,विजा चमकत होत्या थोडे पुढे गेलो आणि पावसाचा मारा सुरु झाला. माल टाकण्यासाठी गेलेले गाव अत्यंत आडरानी होते.
कधीतरी एखादी गाडी रस्त्यावरून जाताना येताना दिसत होती.त्या अवेळी आलेल्या पावसात हि आम्ही दोघे माल टाकून परत निघालो.
परतीचा मार्ग चालू झाला तरी पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता , गाडीचा वेग हि आता बऱ्यापेकी मंदावला होता. अंधाराचे साम्राज्य पसरत चालले
होते चमकणाऱ्या विजा त्या अंधारला दूर करण्याचा जणू प्रयतनच करत होत्या. आम्ही मात्र त्यांचा चाललेला खेळ पाहत गाडीच्या दिव्यात कसाबसा रस्ता
काटत होतो. त्याचवेळेस अचानक एका झाडाखाली कोणीतरी गाडीला हात दाखवत आहे असे दिसले गाडीचे ब्रेक लावले गाडी थांबली त्या झाडाखाली एक माणूस
चिंब भिजलेल्या अवस्थेत उभा होता. मी त्याला विचारले काय काम आहे ? तर गावकडे यायचे आहे म्हणाला आम्ही त्याला होकारार्थी मान हलवली त्यावेळेस
त्याच्या तोंडावर उठलेले हास्य काळीज चीर करून गेले आणि आज महाराष्ट्रच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सरकार किती खेड्यापर्यंत पोहचले आहे याचे एक उदाहरणच
देवून गेले
तो काही एक विचार न करता पटकन गाडीत चढला आणि पाठीमागे समान ठेवायच्या जागी जावून बसला . गाडी पुन्हा चालू झाली थोड्या वेळाने मागे असलेल्या
खिडकीतून तोंड घालून त्याने सांगीतले "नाक्यावर सोडा " मी त्याला हो म्हणालो. मग माझ्या आपल्या त्याच्याशी गप्पा चालू झाल्या मी त्याला विचारले इतक्या पावसात
कुठे निघाला मामा ? त्यावर त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे शहरात राहणाऱ्या माणसाला मारलेली सणसणीत चपराक होती ते म्हणाला " मालक पेरणी केली होती आताच , सार
घरबार राबल शेतात ........., खूप अपेक्षा होती येणाऱ्या पिकावर. यंदाच्या पिकावर या दिवाळीत मोठया मुलीचे लगीन करयचं होतं बघा पण हि लाईट म्हणजे जणू यमकाळ ठरली
आहे आमच्यासाठी १५-१६ तास नसते आणि ज्यावेळेस येते त्यावेळेस पाक कमी पावर ने येते त्याच्यावर घरातला बल्ब भी नीट चालत नाही तर विहिरीवरची मोटार काय खाक चालयची.
पाणी नाही मिळाल पिकला त्यामुळे नवीन रोप जळून गेलं बघा आता परत बी आण्याच हाय आणि नवीन पेरणी करयाची हाय निदान हा पाऊस तरी काय तरी करल इतकीच अपेक्षा .
तुमच बर हाय नाय का २४ घंटे लाईट असती नव्ह का ? कारखान असतात तुमच्याकड म्हणून २४ घंटे लाईट आणि आमच्याकड काहीच नाही व्हये ? पण मालक तुमच्या कारखान्यातली
माणसं काय हवेवर जगतात काय पोट भरायाला तर आम्हीच पुरवतो की धान्य मगच ताकदीनं काम करतात ती मग लाईट ची गरज कोणाला हाय ? लई नको पण पाहिजे तितकी तरी द्या की
तुम्हाला टी.वी,टेप, थंड हवेच मशीन लावयला लाईट हाय आणि आम्हाला पाण्यापुर्ती सुद्धा नाही असं का ?"
त्यांचे बोलणे चालू होते तितक्यात नाका आला गाडी थांबली मामा उतरले आणि सदऱ्याच्या खिशात हात घालत पैसे पुढे करू लागले मी नकारअर्थी मान हलवली तरी ते आग्रह करत होते
"कोणाचे फुकट उपकार घेत नाही आम्ही" म्हणत हात तसाच पुढे करून उभा होते तितक्यात गाडी हलली आणि आम्ही पुढे आमच्या वाटेकडे निघालो मामा नजरे आड होई पर्यंत मी त्यांच्याकडे
पाहत होतो परीस्थीने ग्रासलेल्या त्या माणसाच्या मनाच्या मोठेपणाने माझ्या डोळ्यात मात्र पाणी उभे केले होत त्यावेळेस मी ठरवले की जितकी शक्य आहे तितकी मदत या सर्वाना करयाची
कशी तर अनाआवश्यक लाईट वापर टाळून आवश्यक तितकी लाईट वापरून म्हणजे अश्या किती तरी शेतकरी बांधवांच्या मुलींच्या लग्नात दिलेला तो एक मोठा "आहेर" असेल नाही का ............

शाळा

त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुध...